प्रतिध्वनी

जीवनाचं गणित

जीवनाचं गणित

जीवनाचं गणित

जीवनाचं गणित

जीवन हे एक गणित असतं.

जगल्याशिवाय नाहीच  ते उलगडत.

सुखदुःखाची उजळणी बालपणापासूनचतोंडपाठ करायची असते.

नुसते पाठांतर आणि नाही भागत,

पचवायची असते कट्टरपणे घोकत घोकत.

बेरीज जास्त असते कुणाच्या आयुष्यात,

सुख, संपत्ती, वैभवच मिळतं जास्त.

काहींच्या आयुष्यातून हे सारचं वजा होतं.

कुणाचं आयुष्यभर गुणाकाराशीच नातं,

जगावं सुखदुःखाचा, ऐश्वर्याचा भागाकार करत.

स्वार्थापेक्षा परमार्थाला ही स्थान देत देत.

जीवनाचं गणित कुणाकुणाला फार सुलभपणे सुटतं.

कुणाकुणाच्या आयुष्यात पदोपदी कोडं पडतं.

सोप्प वा कठीण गणित प्रत्येकालाच सोडवायचंच असतं.

वेगवेगळ्या पद्धती वापरून पण उजळणी एकच असते.

श्रमांची कास नि सचोटीची जपत.

ध्येय, निष्ठा, श्रद्धा ठेवा, जगाल सुसंगतजीवनाचं गणित

जीवन हे एक गणित असतं.

जगल्याशिवाय नाहीच  ते उलगडत.

सुखदुःखाची उजळणी बालपणापासूनचतोंडपाठ करायची असते.

नुसते पाठांतर आणि नाही भागत,

पचवायची असते कट्टरपणे घोकत घोकत.

बेरीज जास्त असते कुणाच्या आयुष्यात,

सुख, संपत्ती, वैभवच मिळतं जास्त.

काहींच्या आयुष्यातून हे सारचं वजा होतं.

कुणाचं आयुष्यभर गुणाकाराशीच नातं,

जगावं सुखदुःखाचा, ऐश्वर्याचा भागाकार करत.

स्वार्थापेक्षा परमार्थाला ही स्थान देत देत.

जीवनाचं गणित कुणाकुणाला फार सुलभपणे सुटतं.

कुणाकुणाच्या आयुष्यात पदोपदी कोडं पडतं.

सोप्प वा कठीण गणित प्रत्येकालाच सोडवायचंच असतं.

वेगवेगळ्या पद्धती वापरून पण उजळणी एकच असते.

श्रमांची कास नि सचोटीची जपत.

ध्येय, निष्ठा, श्रद्धा ठेवा, जगाल सुसंगत

About Author:

श्रीमती. पुष्पलता धर्माजी गांगुर्डे

जनता इंग्लिश स्कूल, दिंडोरी

Experience:

श्रीमती. पुष्पलता धर्माजी गांगुर्डे (श्रीमती. पुष्पलता शिवाजीराव गायकवाड) शैक्षणिक पात्रता: एम. ए. बी. एड. अध्यापनाचा अनुभव: 31.6 वर्षे नोकरीची ठिकाणे: १. जनता इंग्लिश स्कूल, दिंडोरी २. के. आर. टी. हायस्कूल, वणी. ३. मराठा हायस्कूल, नाशिक ४. के. बी. एच. हायस्कूल, गिरणारे (पर्यवेक्षिका)

Comment here