प्रतिध्वनी

कोकणी राजा

कोकणी राजा

कोकणी राजा (1980)

 कमरेपुरती लंगोटी, हातामध्ये काठी,
चालला अर्धपोटी, चिंता नसे मोठी 
चालला हा कोकणी राजा ।। १ ।। 
             डोळ्यात पाणी, पोटात ग्लानी,
             खिशात दोन नाणी, 
             चालला हा अनवाणी
             चालला हा कोकणी राजा || २ ||  
जाऊनी दुकानी, काढुनी नाणी
खुशीने घेतला हुक्कापाणी
दुकानदार घेई दोन नाणी 
चालला हा कोकणी राजा ।। 3 ।। 
             कोकणी बिचारा अडाणी 
              देऊनी त्याला दोन नाणी 
             बापुडा दिसे हा दीनवाणी 
             चालला हा कोकणी राजा ।। ४ ।।            

कोकणी राजा १९८२ बी. एड्. च्या मासिकात प्रसिद्ध

चित्रानंद मधुरा गांवकरी पुरवणीत प्रसिद्ध (चारोळी) दि. १५.१२.९३ 

बोचक्यात संसार, भटक्यांचा गाढवावरी भार 
पोटासाठी भटकंती, पाठिशी उदंड लेकर
वाट खडतर जीवनाची, कष्टून होती चूर 
नित्य दारिद्रय पाठिशी, ओलांडती जीवनतीर
                              श्रीमती पुष्पलता धर्माजी गांगुर्डे 
                          (श्रीमती पुष्पलता शिवाजीराव गायकवाड)

शैक्षणिक पात्रता : एम. ए., बी. एड्. बी. ए.

अध्यापनाचा अनुभव : ३१ वर्षे ६ महिने

व्यवसाय : नोकरी (माध्यमिक शिक्षिका)

नोकरीची ठिकाणे :

 • जनता इंग्लिश स्कूल, दिंडोरी (म. वि. प्र. स. ना.),
 • आर. टी. हायस्कूल, वणी (उपशिक्षिका),
 • मराठा हायस्व नाशिक (उपशिक्षिका),
 • के. बी. एच. हायस्कूल, गिर (पर्यवेक्षिका),
 • श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, मखमला (उपमुख्याध्यापिका),
 • जनता विद्यालय, नायगाव, (मुख्याध्यापिका),
 • मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक संस्थेत संपूर्ण नोकरी केली.

निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,

 • निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य लेखन, कविता इ. लेखन. सा सहभाग व मार्गदर्शन
 • शिक्षकांसाठी ‘मराठी विषयाचे उद्बोधन वर्गांना मार्गदर्शन केले.
 • निबंध स्पर्धा – वनविभाग नाशिक आयोजित – विद्यार्थ्यास बक्षीस.
 • वक्तृत्व स्पर्धा – सहभागासाठी विदयार्थ्यांना मार्गदर्शन.
 • देशस्थ ऋग्वेदी संस्था, नाशिक – कै. आचार्य अत्रे स्पर्धा
 • महाराष्ट्र विद्यालयात स्पर्धा – प्रथम क्रमांक (वक्तृत्व)
 • गो. ह. देशपांडे वक्तृत्व स्पर्धा
 • रचना विद्यालय, नाशिक येथे सहभाग
 •  साने गुरुजी कथामाला, नाशिक
 • तरुण ऐक्य मंडळ, नाशिक – भंडारी शंतनु- प्रथम
 • मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक. दरवर्षी होणा-या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सलग ५ वर्षे प्रथम क्रमांक प्राप्त झाले. (स्वतः लेखन व मार्गदर्शन केले.)

पथनाट्ये लेखन

 • लोकसंख्येचा व्याप,
 • मानवाला शाप’ – * पलुस्कर सभागृहात सादर- मराठा हायस्कूलचे विद्यार्थी, स्पर्धक-११, शालांत प्रथम क्रमांक प्राप्त.
 • परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सादर- के. बी. एच. विद्यालय, गिरणारे शाळेचे विद्यार्थी- ११ शाळांत प्रथम क्रमांक प्राप्त
 • ‘पर्यावरण रक्षण- जीवन संरक्षण’ – श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात सादर- जिल्हा परिषद विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून स्पर्धा- ३५ शाळा नाशिकमधील सहभागी- दुसरा क्रमांक प्राप्त
 • “देवाघरच्या फुला, भविष्य कोणते बोला’ – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्त सादर सहभाग. मराठा हायस्कूलचे विद्यार्थी- मराठा हाय. ना येथे.
 • ‘बाजार’ – हुंड्याविषयी- रचना विद्यालय, नाशिक सहभाग.
 • स्वच्छता पाळा, आरोग्य सांभाळा’ – रुग्ठा हायस्कूल, नाशिक येथे सादर- मराठा हायस्कूलचे विद्यार्थी सहभाग प्रथम क्रमांक प्राप्त.
 • ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ – अंध संस्था, नाशिक. मराठा हायस्कूलचे विद्यार्थी सहभाग- प्रथम क्रमांक प्राप्त.
 • ऊर्जा संकट’ – सिन्नर पंचायत समिती आयोजित स्पर्धा- ‘जनता विद्यालय नायगाव’ चे विद्यार्थी सहभागी- तृतीय क्रमांक प्राप्त.

कविता

 • ५५ कवितांचे हस्तलिखित तयार केले. स्वरचित, स्वलिखित – गांवकरी दैनिकात काव्यांगणमध्ये प्रसिद्ध.
 • २०१४ नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्यात काव्यवाचन सहभाग..
 • शालेय विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याचा अनुभव.
 • ‘जनता विद्यालय, निमोण’ येथे शाळा उद्घाटनप्रसंगी सूत्रसंचालन केले.
 • इ. १० वी मराठी विषय १५ वर्षे सातत्याने १०० टक्के निकाल – मराठा हायस्कूल, नाशिक
 • वक्तृत्व स्पर्धा प्रमुखाचे काम – १२ वर्षे केले.
 • दैनिक गांवकरी व श्री. ज्योती बुक सेलर्स आणि स्टेनशर नाशिक यांच्या वतीने आयोजित ‘टीईटी परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमालेत ‘मराठी विषयाचे मार्गदर्शन केले.
 • प. सा. नाट्यगृह, नाशिक (२०१४-२०१५)

Comments (2)

 1. Great content! Super high-quality! Keep it up! 🙂

 2. Awesome post! Keep up the great work! 🙂

Comment here