प्रतिध्वनी

अमृतमय नाम तुझे

अमृतमय नाम

अमृतमय नाम तुझे नित्य स्मरू दे,

दे सुबुद्धी अशीं दे. ।। धृ ।। 

भयकारी व्यथा होता, तूची एकमेव त्राता, 

संसाराच्या रणभूमीत भावनांची युद्धे होता. 

घाव घाली त्यावरी, प्रभो निवारीशी सर्व चिंता, 

कळी काळाशी तोंड देण्या सदैव शक्ती दे. 

अमृतमय नाम तुझे नित्य स्मरू दे, 

दे सुबुद्धी अशी दे. ।। १ ।।

असत्याचा नको संपर्क, 

चाड सत्याची धरू दे, 

अभद्र बोलणे नको मुखी, अशी बुद्धी दे. 

जिंदा न पडो कानीं, संधी अशी दे, 

सन्मार्ग अंगिकारण्यास सदैव शक्ती दे. 

अमृतमय नाम तुझे नित्य स्मरू दे.

दे सुबुद्धी अशीं दे ।। २ ।।

संसर्ग दुर्जनांचा न कधी घडावा, 

दुर्लभ नरदेह सत्कर्मी पडावा. 

सदैव हातुनी माइया सत्कृत्य घडू दे, 

मानव जन्म सार्थ होण्या नित्य झटू दे. 

अमृतमय नाम नित्य स्मरू दे, 

दे सुबुद्धी अशी दे. ।। ३ ।।

तुझे नाम नित्य स्मरू दे

 

अमृतमय नाम तुझे नित्य स्मरू दे,

दे सुबुद्धी अशीं दे. ।। धृ ।। 

भयकारी व्यथा होता, तूची एकमेव त्राता, 

संसाराच्या रणभूमीत भावनांची युद्धे होता. 

घाव घाली त्यावरी, प्रभो निवारीशी सर्व चिंता, 

कळी काळाशी तोंड देण्या सदैव शक्ती दे. 

अमृतमय नाम तुझे नित्य स्मरू दे, 

दे सुबुद्धी अशी दे. ।। १ ।।

असत्याचा नको संपर्क, 

चाड सत्याची धरू दे, 

अभद्र बोलणे नको मुखी, अशी बुद्धी दे. 

जिंदा न पडो कानीं, संधी अशी दे, 

सन्मार्ग अंगिकारण्यास सदैव शक्ती दे. 

अमृतमय नाम नित्य स्मरू दे.

दे सुबुद्धी अशीं दे ।। २ ।।

संसर्ग दुर्जनांचा न कधी घडावा, 

दुर्लभ नरदेह सत्कर्मी पडावा. 

सदैव हातुनी माइया सत्कृत्य घडू दे, 

मानव जन्म सार्थ होण्या नित्य झटू दे. 

अमृतमय नाम नित्य स्मरू दे, 

दे सुबुद्धी अशी दे. ।। ३ ।।

About Author:

श्रीमती. पुष्पलता धर्माजी गांगुर्डे

जनता इंग्लिश स्कूल, दिंडोरी

श्रीमती. पुष्पलता धर्माजी गांगुर्डे (श्रीमती. पुष्पलता शिवाजीराव गायकवाड) शैक्षणिक पात्रता: एम. ए. बी. एड. अध्यापनाचा अनुभव: 31.6 वर्षे नोकरीची ठिकाणे: १. जनता इंग्लिश स्कूल, दिंडोरी २. के. आर. टी. हायस्कूल, वणी. ३. मराठा हायस्कूल, नाशिक ४. के. बी. एच. हायस्कूल, गिरणारे (पर्यवेक्षिका)

Comment here